मराठी चित्रपटसृष्टीतील स्त्रीशक्तीच्या नऊ रूपांचा उत्सव; नवरात्रीत पाहा तेजश्री प्रधान ते मुक्ता बर्वेचे हे दमदार चित्रपट
- September 29, 2025
- Ultra Team
Navratri 2025 Special: या सर्व चित्रपटांमध्ये स्त्रियांची संघर्षमय, भावनिक आणि प्रेरणादायी वाटचाल दिसते. कुणी आत्मशोधाच्या प्रवासाला निघते, कुणी समाजातील अन्यायाला आव्हान देते,
नवरात्रीचे नऊ दिवस, नऊ रंग आणि नऊ रूपं – या अनोख्या संकल्पनेला आकार देत अल्ट्रा झकास मराठी ओटीटी प्रेक्षकांसाठी घेऊन आला आहे ‘अल्ट्रा झकासची दुर्गा’ हा खास संग्रह. या विशेष निवडीतून नऊ वेगवेगळ्या मराठी चित्रपटांद्वारे नऊ ‘अद्वितीय स्त्री’ पात्रं पडद्यावर जागृत होत आहेत. या सर्व चित्रपटांमध्ये स्त्रियांची संघर्षमय, भावनिक आणि प्रेरणादायी वाटचाल दिसते. कुणी आत्मशोधाच्या प्रवासाला निघते, कुणी समाजातील अन्यायाला आव्हान देते, कुणी नात्यांतील गुंतागुंत आणि जबाबदाऱ्यांशी झुंजते, तर कुणी प्रेम, संवेदनशीलता आणि त्यागाचं सामर्थ्य दाखवते. या कथा स्त्रीशक्तीची विविध रूपं उलगडत, प्रेक्षकांच्या मनावर अमिट छाप सोडतात.
१. काळूबाई पावली नवसला -अलका कुबल
श्यामराव आणि राधिकाला कामिनी मुलगी होते. एका वादातून राधिकेचा मृत्यू होतो. कामिनीला काकू छळते, पण आई काळूबाई नेहमीच तिच्या सोबत असतात. वर्षांनंतर कामिनी मोठी झाल्यावरही आई काळूबाई तिचं रक्षण करतात.
२. पैंजण – वर्षा उसगावकर
स्टार कलाकार पिलाजीराव बेपत्ता होतो. इन्स्पेक्टर अजय देशमुख चौकशी करतात आणि तमाशा पथकाच्या गुपितांतून गूढ रहस्य उलगडू लागतं.
३. हंपी – सोनाली कुलकर्णी
ईशा स्वतःला शोधायला हंपीला जाते. तिथे तिला कबीर भेटतो जो तिला छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिकवतो. त्यांच्या मैत्रीतून जीवनात नवा रंग भरतो.
४. सावर रे – मुक्ता बर्वे
मुक्ता एका अपघातात अपंग होते. तिची बहीण इंदू स्वतःचं आयुष्य बाजूला ठेवून बहिणीची सेवा करते आणि अपघात करणाऱ्या ड्रायव्हरला शोधण्याच्या निर्धाराने पुढे जाते.
५. RESPECT – प्राजक्ता माळी
सात महिलांच्या वेगवेगळ्या कथा, ज्या एकमेकांना कधी भेटल्या नाहीत, पण त्यांचा संघर्ष त्यांना एकमेकांशी जोडतो.
६. फटाकडी – सुषमा शिरोमणी
वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी फटकडी खुनीच्या मुलाला सत्य दाखवण्याचा प्रयत्न करते. या प्रवासात तिला बावल्या नावाच्या पोलिसाची साथ मिळते.
७. संहिता – देविका दफ्तरदार
एका निर्मात्याची पत्नी तिच्या आजारी पतीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माहितीपट निर्मात्याला कामावर घेते. त्यातून राजघराण्याची कथा – राजा, राणी आणि दरबारी गायक यांच्यातील प्रेम-कर्तव्य-विश्वासघाताची कहाणी उलगडते.
८. गौरीच्या लग्नाला यायचं हं – स्मिता तांबे
गौरीच्या काळ्या रंगामुळे तिला नवरा मिळत नाही आणि ती नैराश्यात जाते. पण एक शाळामास्तर तिचा आत्मविश्वास वाढवतो. मैत्री हळूहळू प्रेमात बदलते आणि गौरी अखेर लग्नाच्या मंडपात पोहोचते.
९. लोकशाही – तेजश्री प्रधान
एका मुलीला वडिलांचा राजकीय वारसा मिळतो. पण त्या वारशामागचं सत्य उलगडताना तिला कटकारस्थानं, कौटुंबिक संघर्ष आणि न्यायासाठीची लढाई यांचा सामना करावा लागतो.
या नऊ चित्रपटांतून नवरात्रीचे नऊ रंग आणि स्त्रीत्वाच्या नऊ शक्तिरूपांचा अनोखा संगम अनुभवायला मिळतो. अल्ट्रा झकास ओटीटीचा हा उपक्रम स्त्रीशक्तीचा सन्मान करताना प्रेक्षकांना नव्या प्रेरणाही देतो. ‘अल्ट्रा झकासची दुर्गा’ हा संग्रह फक्त मनोरंजनापुरता मर्यादित नसून तो स्त्रीशक्तीचा गौरव करणारा आणि समाजाला प्रेरणा देणारा आहे. हे चित्रपट प्रेक्षकांना अल्ट्रा झक्कास मराठी अॅपवर पाहता येणार आहेत.