ग्रामीण महाराष्ट्राची रंगतदार कथा, ‘भागूबाई’ ट्रेलर रिलीज; Nirmiti Sawant पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार

  • April 14, 2026
  • Ultra Team

ग्रामीण महाराष्ट्राच्या रंगतदार पार्श्वभूमीवर आधारित असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना वेगळा अनुभव देणार आहे. ट्रेलरमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढली असून चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री निर्मिती सावंत पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. ‘भागूबाई’ या आगामी चित्रपटात त्या मुख्य भूमिकेत दिसणार असून आज या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.ग्रामीण महाराष्ट्राच्या रंगतदार पार्श्वभूमीवर आधारित असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना वेगळा अनुभव देणार आहे. ट्रेलरमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढली असून चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. ‘भागूबाई’ हा चित्रपट २४ एप्रिल २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘भागूबाई’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ‘भागूबाई’ या खट्याळ, बिनधास्त आणि गप्पिष्ट बाईची मजेशीर दुनिया पाहायला मिळते. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये नाक खुपसत ती गावात गोंधळ माजवते आणि साध्या घटनांना मोठं रूप देत नात्यांमध्ये गैरसमज निर्माण करते. पण या सगळ्या विनोदामागे एक गंभीर सत्य दडलेलं असल्याची झलकही ट्रेलरमध्ये दिसते.

जाहिरात

या चित्रपटाचा गाभा म्हणजे निर्मिती सावंत यांची मुख्य भूमिका. त्यांच्या खास कॉमिक टायमिंगसोबतच भावनिक अभिनयाची झलक यात पाहायला मिळते. ‘सुपर डुपर’ मधील यशानंतर त्या पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपलंसं वाटेल अशी, मातीशी जोडलेली व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत.

चित्रपटातील कलाकार

चित्रपटात भार्गवी चिरमुले, शशांक शेंडे, मंगेश देसाई, विजय पाटकर, नागेश भोंसले आणि निखिल चव्हाण यांचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे.भागुबाई चित्रपटाची कथा एका अशा बाई भोवती फिरते, जिला गावातल्या गप्पा आणि कुचाळक्या करण्यात विशेष आनंद मिळतो. मात्र तिच्या आयुष्यात घडणारी एक अनपेक्षित घटना सगळंच चित्र बदलून टाकते. त्या घटनेनंतर तिच्या आयुष्यात आणि गावात काय बदल होतात हे या चित्रपटात पाहायला मिळेल.

या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय अमर यांनी केलेलं असून वास्तवाशी जोडलेली आणि भावनिक स्पर्श असलेली ही कथा प्रेक्षकांना नक्कीच भावेल, तर निर्माती श्रद्धा पटेल यांनी ही कथा प्रेक्षकांपर्यंत भावनिक पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. हास्य, नाती आणि लपलेलं सत्य यांचा सुरेख मेळ साधणारा ‘भागूबाई’ हा चित्रपट एक वेगळा आणि मनोरंजक अनुभव देण्याचं आश्वासन देतो.