‘८ वाजून १३ मिनिटे’ पहिल्यांदाच सुनील बर्वे ऐश्वर्या नारकर एकत्र, वेब सिरीजचे Poster पाहून अंगावर येईल काटा

  • May 19, 2026
  • Ultra Team

अनेक वर्ष काम करूनही पहिल्यांदाच सुनील बर्वे आणि ऐश्वर्या नारकर वेब सिरीजमध्ये झळकणार आहेत. या वेबसिरीजच्या पोस्टवरूनच ही कथा रहस्यमयी असणार हे लक्षात येत आहे, जाणून घ्या

  • सुनील बर्वे आणि ऐश्वर्या नारकर पहिल्यांदाच एकत्र 

  • वेब सिरीजमधून येणार प्रेक्षकांसमोर 

  • ८ वाजून १३ मिनिटे नक्की काय आहे

एका साध्या –  सरळ प्रामाणिक माणसाच्या आयुष्यात अचानक मृत्यूची चाहूल लागली, तर काय होईल? त्या एका क्षणानंतर त्याच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलून जाईल का? अशाच रहस्य, भावना आणि थराराने भरलेली नवी अल्ट्रा झकास ओरिजिनल मराठी वेब सिरीज ‘८ वाजून १३ मिनिटे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

येत्या २९ मे २०२६ ला ही बहुचर्चित सिरीज अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार असून, १५ मे २०२६ ला या वेब सिरीजचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. हा पोस्टर एका रहस्यमय आणि भावनिक कथेची झलक प्रेक्षकांसमोर आणते.

प्रेक्षकांसमोर येणार ओरिजनल कंटेट 

‘सौभाग्यवती सरपंच’, ‘आयपीसी’, ‘राख’ आणि ‘खोताची वाडी’ यांसारख्या वेगळ्या आशयाच्या ओरिजिनल्स नंतर ‘८ वाजून १३ मिनिटे’च्या माध्यमातून ‘अल्ट्रा झकास मराठी ओटीटीने आपल्या ओरिजिनल कंटेंटमध्ये आणखी एका दमदार कथानकाची भर घातली जाणार आहे.

दिग्दर्शक गिरीश मोहिते यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या ८ वाजून १३ मिनिटे वेब सिरीजमध्ये सुनील बर्वे आणि ऐश्वर्या नारकर हे लोकप्रिय कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. यांच्यासोबतच शरद पोंक्षे , उदय सबनीस, संजीव जोटांगिया आणि विनीत शर्मा हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

प्रेक्षकांसाठी पर्वणी 

रहस्य, भावनिक संघर्ष आणि अनपेक्षित वळणांनी गुंफलेली ‘८ वाजून १३ मिनिटे’ ही वेब सिरीज प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. एका क्षणामुळे आयुष्य कसं पूर्णपणे बदलू शकतं आणि त्या बदलामुळे नात्यांमध्ये तसेच मनात कोणते ताण निर्माण होतात, याचा सखोल वेध तुम्हाला हि वेब सिरीज देईल. त्यामुळे ही सिरीज फक्त सस्पेन्सपुरती मर्यादित राहत नाही, तर ती भावनिक पातळीवरही प्रेक्षकांना जोडते.

काय म्हणाले दिग्दर्शक 

या वेब सिरीजचे दिग्दर्शक गिरीश मोहिते म्हणाले, “८ वाजून १३ मिनिटे ही केवळ एक सस्पेन्स कथा नाही, तर ती एका साध्या माणसाच्या आयुष्यातील भावनिक उलथापालथ दाखवणारी गोष्ट आहे. दिग्दर्शक म्हणून मी आजवर अनेक प्रयोग केले आहेत, पण या कथेतली भावनिक खोली प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. या सिरीजमधील ‘८ वाजून १३ मिनिटे’ ही वेळ केवळ घड्याळावरची वेळ नसून, ती आयुष्याला कलाटणी देणारा एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट आहे, हे प्रेक्षकांना नक्कीच जाणवेल.”

प्रादेशिक ओटीटी कंटेंटच्या वाढत्या लोकप्रियतेबद्दल बोलताना ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’चे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, “आजचे प्रेक्षक स्थानिक संस्कृतीशी जोडलेल्या कथा पाहण्यास अधिक पसंती देत आहेत. आणि ‘८ वाजून १३ मिनिटे’ सारख्या ओरिजिनल वेब सिरीजच्या माध्यमातून ‘अल्ट्रा झकास’ मराठी OTT हे मनोरंजन अधिक समृद्ध करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहे.”