‘८ वाजून १३ मिनिटे’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित; ओटीटीवर येतोय नवा थरार!
- May 27, 2026
- Ultra Team
सुनील बर्वे–ऐश्वर्या नारकर यांची दमदार केमिस्ट्री चर्चेत
(मनोमय वृत्तसेवा) – आयुष्यात काही क्षण असे असतात, जे सगळंच बदलून टाकतात… पण जर त्या एका क्षणासोबत मृत्यूची चाहूल जोडली गेली, तर? अशाच रहस्य, भावना आणि अनपेक्षित घटनांनी भरलेल्या ‘८ वाजून १३ मिनिटे’ या आगामी मराठी वेब सिरीज चा थरारक ट्रेलर आज, २५ मे २०२६ रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. अल्ट्रा झकास मराठी ओटीटी वरील ही बहुचर्चित ओरिजिनल वेब सिरीज येत्या २९ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मानवी भावनांचा वेध घेणारी वेबसेरिज
ट्रेलरमध्ये एका साध्या आणि प्रामाणिक माणसाच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या घटनांमुळे निर्माण झालेला तणाव, नात्यांमध्ये होणारे बदल आणि वाढत जाणारे रहस्य प्रभावीपणे दाखवले आहे. प्रत्येक दृश्यात सस्पेन्ससोबत भावनिक बाजूही जाणवते. त्यामुळे ही सिरीज फक्त रहस्यकथा नसून मानवी भावनांचा वेध घेणारी ठरते.
सुनील बर्वे आणि ऐश्वर्या नारकर यांची ट्रेलरमध्ये लक्षवेधी अभिनयाची झलक
‘सौभाग्यवती सरपंच’, ‘आयपीसी’, ‘राख’ आणि ‘खोताची वाडी’ यांसारख्या वेगळ्या धाटणीच्या ओरिजिनल्सनंतर ‘अल्ट्रा झकास’ पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी अनोखा आणि दर्जेदार कंटेंट घेऊन येत आहे. ‘८ वाजून १३ मिनिटे’ या वेब सिरीजमध्ये पहिल्यांदाच सुनील बर्वे आणि ऐश्वर्या नारकर ही लोकप्रिय जोडी एकत्र झळकणार असून, त्यांच्या अभिनयाची झलक ट्रेलरमध्ये विशेष लक्ष वेधून घेत आहे.
वेबसिरीजमध्ये उदय सबनीस, संजीव जोटांगिया आणि विनीत शर्मा
दिग्दर्शक गिरीश मोहिते यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या वेबसिरीजमध्ये शरद पोंक्षे, उदय सबनीस, संजीव जोटांगिया आणि विनीत शर्मा हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. रहस्य आणि भावनिक नाट्य यांचा उत्तम समतोल साधणारी ही कथा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.
एका क्षणानंतर नायकाच्या आयुष्यात बदल
ट्रेलर लाँचबद्दल बोलताना दिग्दर्शक गिरीश मोहिते म्हणाले, ट्रेलरमधून आम्ही प्रेक्षकांना कथानकाची केवळ एक झलक दिली आहे. ‘८ वाजून १३ मिनिटे’ ही वेळ या कथेत खूप महत्त्वाची आहे. त्या एका क्षणानंतर नायकाच्या आयुष्यात जे बदल घडतात, ते प्रेक्षकांना सतत विचार करायला भाग पाडतील. सस्पेन्ससोबतच या कथेत भावनिक खोलीही तितकीच महत्त्वाची आहे.
‘८ वाजून १३ मिनिटे’ ही वेब सिरीज येत्या दि.२९ मे २०२६ रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
‘अल्ट्रा झकास’ मराठी OTT कडून मनोरंजन समृद्ध करण्याचा प्रयत्न
प्रादेशिक ओटीटी कंटेंटच्या वाढत्या लोकप्रियतेबद्दल बोलताना ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’चे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, आजचे प्रेक्षक स्थानिक संस्कृतीशी जोडलेल्या कथा पाहण्यास अधिक पसंती देत आहेत. आणि ‘८ वाजून १३ मिनिटे’ सारख्या ओरिजिनल वेब सिरीजच्या माध्यमातून ‘अल्ट्रा झकास’ मराठी OTT हे मनोरंजन अधिक समृद्ध करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहे.
अल्ट्रा झकास मराठी ओटीटीबद्ल
अल्ट्रा झकास प्लॅटफॉर्म Android, iOS, टॅब, वेब, Android TV, Fire TV, Jio Store आणि Cloud TV यांसारख्या विविध डिव्हाइसवर सहज उपलब्ध आहे. त्यामुळे प्रेक्षकांना कधीही, कुठेही मनोरंजनाचा आनंद घेता येतो. तसेच आठवड्याला फक्त ₹१९ पासून सुरू होणाऱ्या परवडणाऱ्या सबस्क्रिप्शन प्लॅनमुळे हा प्लॅटफॉर्म अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे.