स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओकचा ‘जिलबी’ आता हिंदीत येणार, कधी आणि कुठे होणार रिलीज ?

  • February 19, 2025
  • Ultra Team

स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक स्टारर ‘जिलबी’च्या निमित्ताने मराठीतील दर्जेदार कथा हिंदी प्रेक्षकांसमोरही सादर होणार आहे. हा प्रवास केवळ भाषेचा नाही, तर मराठी कलाकारांच्या आणि संकल्पनांच्या विस्ताराचा आहे.

मराठी चित्रपटसृष्टीने नेहमीच प्रेक्षकांना दर्जेदार चित्रपट दिले आहेत. आता ‘जिलबी’च्या निमित्ताने मराठीतील दर्जेदार कथा हिंदी प्रेक्षकांसमोरही सादर होणार आहे. हा प्रवास केवळ भाषेचा नाही, तर मराठी कलाकारांच्या आणि संकल्पनांच्या विस्ताराचा आहे.

मराठी आणि हिंदी प्रेक्षकांसाठी गुन्हेगारी थरारपट ‘जिलबी’ 21 फेब्रुवारी २०२५ ला अल्ट्रा झकास (मराठी) आणि अल्ट्रा प्ले (हिंदी) या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च केला गेला! ही कथा आहे मुंबईत घडलेल्या एका रहस्यमय हत्याकांडाची, ज्याने संपूर्ण पोलीस यंत्रणेला हादरवून सोडले आहे.

अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंट यांच्या सहयोगाने आणि आनंद पंडित मोशन पिक्चर्स सादर ‘जिलबी’, निर्माते आनंद पंडित आणि रूपा पंडित प्रस्तुत, दिग्दर्शक नितीन कांबळे यांच्या कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाखाली साकारलेला हा एक अनोखा रहस्यमय चित्रपट आहे. चित्रपटात स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, शिवानी सुर्वे, गणेश यादव, प्रणव रावराणे, पर्णा पेठे, अश्विनी चावरे, प्रियांका भट्टाचार्य, ऋषी देशपांडे, राजेश कांबळे, पंकज खामकर आणि दिलीप कराड यांनी प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. या सर्व कलाकारांनी चित्रपटाच्या उत्कंठावर्धक आणि रहस्यमय प्रवासाला वेगळ्या उंचीवर नेले आहे.

सुप्रसिद्ध उद्योगपती सुभेदार यांचा जावई आशुतोष पाचा यांचा निर्घृण खून होतो आणि त्याचा तपास करण्याची जबाबदारी एका हुशार पण भ्रष्ट पोलीस अधिकारी विजय करमरकर यांच्याकडे दिली जाते . तपासाच्या दरम्यान, करमरकर पोलिसाला सुभेदार कुटुंबातील काळ्या दुनियेची सत्य समोर येतात. घरातील सदस्यांमध्ये असलेली ही कटकारस्थानं, अनैतिक संबंध आणि वैयक्तिक हत्येच्या मागे या गूढ रहस्याचा संकेत देतात? करमरकरला या प्रकरणाचा फायदा करून घ्यायचा असतो, पण लवकरच त्याला समजते की तो स्वतःच एका मोठ्या जाळ्यात अडकत चालला आहे. आता या गुंतागुंतीतून सुटका करून सत्य बाहेर आणणे त्याच्या आयुष्याचा प्रश्न ठरतो.

मराठी चित्रपटसृष्टीने वेळोवेळी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे, आणि आता ओटीटी प्लॅटफॉर्मच्या मदतीने तिची व्याप्ती वाढत आहे. या प्रवासात मराठी कलाकार, निर्माते आणि ओटीटी ॲप्स यांना योग्य प्रमाणात पाठिंबा मिळणे गरजेचे आहे. जसे हिंदी आणि इतर प्रादेशिक सिनेसृष्टींना जागतिक स्तरावर मोठे प्लॅटफॉर्म मिळतात, तसेच मराठी सिनेसृष्टीलाही व्यापक संधी उपलब्ध व्हाव्यात. ‘जिलबी’ हा चित्रपट हा प्रवास आणखी बळकट करणारा ठरेल आणि नवीन प्रेक्षकवर्गाला मराठी कलाकृतींशी जोडून ठेवेल.

अल्ट्रा मीडिया आणि एंटरटेनमेंटचे सी. ई. ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, “मराठी सिनेमा आणि कलाकार केवळ भाषेपुरते मर्यादित नाहीत, तर ते एक समृद्ध सांस्कृतिक ठेवा आहेत. ‘जिलेबी’सारख्या चित्रपटांच्या माध्यमातून हा ठेवा अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि म्हणूनच हा चित्रपट आम्ही आता हिंदीमध्ये देखील प्रदर्शित करत आहोत.”